ग्रामपंचायत मुतखेल व श्रीशिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नातुन इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न.
पाभरगडाचा इतिहास
पाभरगड हा अकोले तालुक्यातील गडकिल्ल्यातील एक गड आहे.या गडाला देखील महत्त्वपूर्ण असा इतिहास आहे. या गडावर देखील पाण्याचे टाके आहेत. तसेच ते बारामाही आहेत. पाभरगडाचे महत्व सांगावयाचे झाल्यास या गडावरून आपण पश्चिमेला दृष्टी टाकल्यास आपणास एकच दृष्टी क्षेपात. रतनगड,आजोबा डोंगर,अलंग,कुलंग आणि मदनगड दिसतात. तसेच उत्तरेला बघितल्यास महाकाळाचा डोंगर दिसतो. याच डोंगरावर क्रांतिवीर राघोजी यांचे राहण्याचे ठिकाण बाडगीचे माची, पद्य किल्ला, चेमदेवाचा डोंगर आपणास दिसते. तसेच दक्षिणेला मुळान्ह्यारातील हरिश्चंद्रगड,शिरपुंजे,डोंगरावरील बहिरोबा यांसारखी ठिकाणी आपणास या गडावरून एकाच वेळी दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्त याचे मनमोहक दृश्य आपणास याच ठिकाणावरून पहावयास मिळते. या गडावर जाण्यास तेरुंगण, गुहिरे,भंडारदरा,धामणवन आणि मुतखेल या ठिकाणाहून गडावर जाण्यास पाऊलवाटाआहेत. गडावर बऱ्याच छोट्या-मोठ्या ऐतिहासिक खुणा आहेत. गडाजवळ असणाऱ्या पाभरखिंडीला अनन्यसाधारण इतिहासिक महत्त्व आहे. रतनगडावर झालेल्या सन.१८२० च्या लढाईचे साक्षीदार पाभर खिंड आहे. या लढाईत बालवीर कृष्णा खाडे यांना रतनगडाच्या माचीत कॅप्टन मॅकीन टाॅश बरोबर झालेल्या चकमकीत याच माचीत वीरमरण आले. जेव्हाही खबर कृष्णाची पत्नी बालवीर रुक्मिणीला कळताच वाऱ्याच्या वेगाने तिने रतनगडा कडे धाव घेतली. सोबतीला तुकारामाला घेऊन पाभरगडाच्या खिंडीत जाऊन थांबली कारण इथूनच राजुर ते रतनगड कडे जाण्यास रस्ता होता. रामजी भांगरे व गोविंद खाडे यांना साखळ दंडाने खिळून त्यांना घेऊन. मॅकीन टॉश याच मार्गाने जाणार होता. काही वेळाने खिंडीच्या पायथ्याशी इंग्रजांची फौज वरती येत होती. असे दिसतात रुक्मिणीने हातात बंदूक घेऊन दबा धरून सावधगिरीत होती. तेवढ्यात मॅकीन टॉशचे सहकारी पीट आणि पीटर दिसता क्षणी तिने गोळीबार करून या दोघांना ठार केले. गोळीबाराचा आवाज ऐकून मॅकीन टाॅश सावध झाले. त्यांनी मोठ्या दगडाचा आश्रय घेतला,दबा धरून बसलेल्या रुक्मिणीने गोळीबार करतात, एक गोळी मॅकीन टाॅशच्या हॅटला लागली.(म्हणतात ना जीवावर आलं पण हॅटवर निभावले) या चकमकीतच रुक्मिणीच्या छातीत गोळी लागून तिला वीरमरण आले. खिंड चढून वर आल्यावर रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांनी हा सर्व प्रकार पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले या बालवीरांगनेने कृष्णाच्या मृत्यूचा बदला घेऊन स्वतःनेही या मायभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करले. रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या या वीरांगणेचे शेवटचे दर्शन घ्यावे अशी वडील व सासऱ्यांची इच्छा असतानाही त्यांना तिचे दर्शन घेता आले नाही. हा प्रसंग अंगावर शाहारे उभारणार आहे. पुढे रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना नगरच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. म्हणून या पाभर गडाची पाभर खिंड ही रुक्मिणीच्या रक्ताने पावन झालेली खिंड आहे.
धन्य ती रुक्मिणी धन्य ती पाभर खिंड.
- राहाळात फिरत असलेल्या कथा ..
नागीण डिवचली गेली
एक एक क्षण तिला एक एक वर्षासारखा वाटत होता. तिच्या जीवाची घाल-मेल झाली होती.तिच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडत होत्या.तळपायाची आग मस्तकाला भिडली होती. सर्वांगाची कशी लाही लाही होत होती.दोन दिवसापासून तिच्या मनाला झालेल्या दुःखाचे आवंडे ती गिळत होती.तिचे कुंकू हरपल होत,पुसल गेलं होत. ज्यानं तिचं कुंकू पुसल.तो कालसर्प क्षणाक्षणाला तिच्या डोळ्यांसमोर तरळून झात होता.केव्हा एकदाची त्याच्या नरडीचा घोट घेईल असं तिला झालं होत.आपल्या जीवाचं सोन झालं तरी हरकत नाही.आता जगण्यात तरी काय अर्थ उरला होता.तिला तीच जीवन नकोस झालं होत.आजची रात्र केव्हा उजाडलं असं तिला झालं होत.पूर्ण दोन दिवस ती याच विचारांच्या तंद्रीत होती. नेत्रांना नेटकी झोप कशी ती नव्हती.काही वेळेला ती बडबडून उठत होती.’अरे निचा, हलकटा, खाल्या घराचे वासे मोजणाऱ्या, काळ सर्पा, कपट वृत्तीच्या नीच,अरे लाल तोंडाच्या माकडा,तू असा माझ्यासमोर ये बघ माझा पराक्रम.’ मेल्या मुडद्या,त्यावेळी मी जर त्या ठिकाणी असते तर तुला केव्हाच यमसदनी पाठविले असते.अरे माकडा,तू काय पराक्रम केलास,एका कोवळ्या बाल वीरावर बंदुकीच्या गोळ्यांनी हल्ला केलास नी त्याचा प्राण घेतला.हा तुझ्या पराक्रमाला डाग लावून घेतलास;पण मी ही रुक्मिणी त्याचा मोबदला घेतल्याशिवाय राहणार नाही.या विचारांच्या तंद्रीतच सूर्योदय केव्हा झाला,तिला कळलं सुद्धा नाही.ती आपल्या खोलीमध्ये बेचैन अवस्थेत पलंगावर बसुन होती.तेवढ्यात मीरा नावाची दासी दरवाजा उघडून आत आली.ती रुक्मिणीला मुजरा करून म्हणाली,’बाईसाहेब,जरा धीर धरा’ जे आपल्या नशीबात होत ते घडल.तिथे कोणी काही करू शकत नाही.दोन दिवस झाले.तुम्ही अन्नाला शिवल्या नाही.हात-पाय तोंड धुवा.मी मोरीमध्ये गरम पाणी आणून ठेवलय.मी पटकन जाऊन चहा घेऊन येते.ती निघुन गेली.रुक्मिणी मोरीमध्ये जाऊन हात-पाय-तोंड धुवून परत पलंगावर येऊन बसली. दासीन कितलीत गरम चहा उकळून आणला होता. रुक्मिणीन चहा घेतला व आता स्वतःच स्वतःला धीर देत ती भानावर आली व तडक उठून ती मधल्या घरात गेली.
सासुू राधाबाईसमोर जाऊन तीनं सासुबाईंचं दर्शन घेतलं. सासुबाईंनं रुक्मिणीला कडकडून मिठी मारली व हंबरडा फोडला. बाळं रुक्मिणीन आत्याबाईंचा सांत्वन कसं करावं? काय करावं? कारण रुक्मिणीही पोक्तबाई नव्हती. चौदावं संपून पंधराव्या वर्षात नुकतच पदार्पण केलेली एक बालिका होती. पण तिनं मोठ्या धिटाईने यांचा सांत्वन करावयास सुरुवात केली. आत्या, आता तुम्ही शोक आवरा. तुमच्या आणि माझ्या नशिबात जे त्यांन लिहिलं होतं ते घडलं.ते कोणालाही चुकलं नाही. तुम्ही व्यर्थ शोक करण्यात काही अर्थ नाही. तुमचा लाडका मुलगा व माझा प्राणसखा पती त्यांनी रणांगणावर पराक्रम गाजवून वीरगती मिळविली. आपला मायाजाळ व्यर्थ होय. त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. ते अमर झाले. तेव्हा आत्याबाई तुम्ही शोक आवरा. आबासाहेब व मामासाहेब यांचे काय झाले देव जाणे. करम भाऊचा अद्यापही तपास नाही.दिवस मध्यावर आलाय. चोंड्याला काय घटना घडल्या त्या खबर तुकाराम भाऊ घेऊन येणार होते. पण अजून आला नाही.माझे सारखे वाटेकडे डोळे लागले आहेत. तेवढ्यातच मीरा दासी धावतच घरात आली व ती सांगू लागली, तुकाराम भाऊ येऊन राहिले आहेत. तेव्हा राधाबाई व रुक्मिणी यांचे कान खबर ऐकण्यासाठी आतुर झाले. तुकाराम लगबगीने वाड्यात आला व राधाबाईंच्या खोलीकडे वळाला. त्याने राधाबाई व रुक्मिणीला मुजरा करून घडलेल्या घटनेची खबर सांगितली. साहेब व भाऊसाहेब यांचा संपूर्ण पाडाव झालाय. त्यांना जीवंत पकडून कैद करून पाभर खिंडीच्या मार्गाने ते लगेच घाटावर यायला निघाले आहेत. तुकाराम भाऊंनी दिलेली खबर ऐकताच रुक्मिणी लगबगीनं आपल्या खोलीमध्ये गेली. कपडे बदलल.हत्यार घेतले. बंदूक व काडतुसांच्या माळा गळ्यात घातल्या व सरळ देवी मंदिरात गेली. आई कळसुबाईचे दर्शन घेतले. तिला साकडे घालायचे ते घातले व ती तिथून वाड्यावर आली. तिने तुकाराम भाऊला घोडा सज्ज करण्यास सांगितला ती राधाबाईच्या खोलीकडे वळाली. तिनं राधाबाईच दर्शन घेतलं. राधाबाईन तिला अजूनही ओळखलं नव्हतं कारण थोड्या वेळापूर्वी पाहिलेली रुक्मिणी आता ती रुक्मिणी नव्हती.ती जणू एक रणचंडिकाच राधाबाईसमोर उभी होती. वीरांगणा राधाबाईला म्हणाली,’मला आपला आशीर्वाद हवाय.’राधाबाईना तिच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला व ती कापऱ्या आवाजात बोलली.’जयवंत हो! यशवंत हो! औक्षवंत हो!’राधाबाईंना तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवले व तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन तिच्या गालाचे चुंबन घेतले. चुंबन घेताना तिच्या कोवळ्या गालांवर राधाबाईंच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा ओघळल्या. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, ‘आत्या हे काय?’आता बाईने पदराने दोन्ही डोळे टिपले. तिचा गळा दाटून आला होता. तिला काय बोलावं हेच कळेना. तेव्हा रुक्मिणी बोलली, ‘आत्या, तुम्ही आजच्या घडीला माझी सासुबाई नाही तर माझी आईचं तुमच्या रूपानं आज या घडीला माझ्यासमोर उभी आहे’ जगले वाचले, तर आपल्या सेवेसाठी मी परत हजर होईन. तेवढ्यात मीराने आरतीचे ताट तयार करून आणले. राधाबाईनं रणचंडिकेला आरतीने ओवाळले. लिंबलोन उतरून टाकले. तिच्या गालांवर बारीक काजळाचा ठिपका लावला. कोणाची दृष्टी लागू नाही म्हणून. मग आरतीचे ताट मीराच्या हाती देऊन राधाबाईंन रुक्मिणीचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन परत मुखांचा चुंबन घेतलं. रुक्मिणीनं परत एक वार सासु(आई) राधाबाईचे पायाला वंदन करून पाठ फिरवली. इकडे तुकाराम भावने दोघांचे घोडे तयार ठेवले होते. मग रुक्मिणीने आई कळसुबाईला वंदन करून ती मर्दानी पावलांनी वाड्याबाहेर पडली व आपल्या घोड्यावर स्वार झाली. तिनं सगळ्यांना एकदाच हात हलवत निरोप दिला व घोड्याला टाच मारली. तसा घोडा तुफान वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. तुकारामनेही पाठोपाठ घोडा फेकला. राधाबाई दारात उभे राहून रुक्मिणीला आजूनही न्याहाळीत होती. फक्त पाठमोरची दिसत होती. पाटमोऱ्या झालेल्या रुक्मिणीकडेे एक टक बघतच राहिली ती दिसेनाशी नाही होईपर्यंत.
घेतला रक्तानं रक्ताचा बदला
सूर्य मावळतीकडे झुकला होता.एक कासराभर मावळतीला बाकी असेल येवढ्या वेळात रुक्मिणी व तुकाराम पाभर किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट जंगलात जाऊन पोहोचले होते. त्यांनी आपले घोडे दूरवरच एका झाडाखाली बांधून टाकले व पायी पायी चालतच पाभरखिंड गाठली. ते दोघेही खिंडीच्या तोंडावर दबा धरून बसले. कॅप्टनच्या फौजेची चाहूल आता स्पष्ट ऐकू येत होती. थोड्याच वेळात पाऊस खिंडीच्या तोंडी येणार होती. तिला फक्त हवा होता तो कॅप्टन मॅकीग टाॅश की ज्यानं तिच्या कपाळाचं कुंकू कायमचं पुसून टाकलं होतं. तोच कॅप्टन घाट चढून वर येत होता. त्याच्यापुढे त्याचे दोन सहाय्यक अधिकारी कॅप्टन पीट व कॅ. पीटर हे दोघेजण होते. त्यांच्यापाठी कॅप्टन मेकीन टाॅश होता. त्याच्या मागे रामजी व गोविंदराव खाडे हे घोड्यावर जेरबंद अवस्थेत होते आणि त्याच्या पाठीमागे सर्व फौजचा तांडा घाट चढून येत होता. रुक्मिणीने या सर्वांची तेहाळणी करून मग ती खिंडीसमोर उभी ठाकली. सुरुवातीला कॅप्टन पीट समोर येतात धाड-धाड गोळ्या एकी पाठोपाठ एक अशा तीन फैरी झाडल्या. कॅप्टन लगेच घोड्यावरून खाली कोसळला. तेवढ्यात कॅप्टन पीटर समोर आला. त्याच्यावरही तिने तीन फैेरी झाडल्या तोही खाली कोसळला. कॅप्टन मेकीन टाॅश धूर्त होता. एक तर त्याने दोनदा फैेरीचा आवाज ऐकल्यावर तो सावध होऊनच खिंडीच्या तोंडी घुसला. रुक्मिणीने पवित्रा घेऊन कॅप्टनच्या कपाळ मोक्षाचा वेध घेतला; पण शेवटी नियतीची रीत काही उलटेच असते. कालचक्र फिरले. तिच्या बंदिकेतून गोळी सुटण्या अगोदर कॅप्टनच्या बंदुकीची गोळी दोन सेकंद आधी सुटली. ती गोळी येऊन तिच्या वर्मी लागली व ती जमिनीवर कोसळली. तिच्या लागोपाठ सुटलेल्या दोन गोळ्या विकीने कॅप्टनच्या कपाळ मोक्ष घेण्याऐवजी कॅप्टनच्या हॅटला लागली. हॅट बेल्ट तुटून मागे उडली. दुसरी गोळी कॅप्टनच्या छाती ऐवजी दंडाला नकळत चाटून गेली. कॅप्टनच्या जीवावर आलं होतं; पण ते हॅटवर निभावलं. पण त्याचे दोन मुख्य सहकारी कायमचे गेले. कॅप्टनने घोड्यावरून खाली उडी घेऊन धावत जाऊन रुक्मिणीला न्याहाळुन पाहिलं. ही कोवळी तरुण मुलगी कोणाची असावी? त्याने रामलीला विचारले, रामजी भांगरा ही कुणाची मुलगी हाय? माझीच मुलगी आहे रामजीने सांगितले. बाप से बेटी सवाई है |लडकी बहुत पराक्रमी थी |उसने बहुत बडा पराक्रम किया है | पॉंच मिनिट के अंदर हमारे दो कॅप्टन मार डाले और हमारे उपर भी दो गोलियॉं चलाई |बहुत डेंजर्स लड़की थी |मैं भी उसके ऊपर फायर चलाई और वो गतप्राण हो गई |बेटी तुम धन्य धन्य हो गई |रामजीच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहात होत्या.आपण हाती घेतलेल्या कार्यात आज माझ्या लाडक्या रुक्मिणीचा सिंहाचा वाटा ठरला.तिने रक्ताचे संबंध हे अतूट असतात हे जाणून घेतले होते म्हणूनच तिने आज या संग्रामात उडी घेऊन रक्ताचा बदला घेऊन धन्य झाली.दोन्ही कुळाचं नांव भूषविण्यासाठी या धाडसी मुलीने वीरांगणाने वीरगती प्राप्त करून घेतली. इ.स. १८२१ सालच्या या राष्ट्रीय उठावाची ती आद्य मानकरीन झाली.पाभरखिंड या वीरांगना रणचंडिका रुक्मिणी खाडे हिच्या रक्ताने पावन झाली
